पुणे- पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्सन मोडमध्ये आले आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पोलिसांनी तब्बल दीड हजार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर शनिवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार रस्त्यावर उतरले. त्यावेळी तब्बल १६५ गुन्हेगारांना अटक केली गेली. आता पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘ब्रम्हास्त्र’ बाहेर काढले आहे. या ‘ब्रम्हास्त्र’ चा वापर करुन २० जणांवर कारवाई केली गेली आहे.
कोणावर झाली कारवाई
पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांवर मकोकाची कारवाई केली आहे. त्यात दत्ता दीपक जाधव , सचिन बबन अडसूळ , ऋषिकेश उर्फ ऋषी राजू शिंदे , अमित बाबू धावरे , गणेश उर्फ दोडया अनंत काथवटे यांच्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण बिभीषण जाधव , ऋषिकेश रवी मोरे, बबन अडसूळ , मनोज उर्फ भुन्मय उर्फ भैया किसन घाडगे, गणेश दीपक जाधव , अक्षय मारुती दासवडकर, अर्जुन उर्फ रोह्या संतोष जोगळे , रोहित उर्फ पप्पू भगवान उजगरे , शेखर उर्फ सोनू नागनाथ जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांना मकोका लावण्यात आला. तसेच चार अल्पवयीन आणि दोन फरार आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे.
का केली कारवाई
दीपक जाधव याने गँग तयार केली होती. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये त्याचा हात होता. शहरात दहशत निर्माण करण्याचे काम तो करत होता. दत्तवाडी पोलीस ठाणे, सावंतवाडी पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अंतर्गत आरोपींनी दहशत निर्माण केली होती. त्यात काही जणांनी गाड्याही फोडल्या होत्या. आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले