Latest Marathi News
Ganesh J GIF

‘पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे यांना मातृशोक

लोणी काळभोर – पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक व प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष जनार्दन गोवर्धन दांडगे यांच्या मातोश्री केशरबाई दांडगे (वय ७५) यांचे मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोवर्धन इंडस्ट्रीजचे संचालक लक्ष्मण दांडगे यांच्या त्या मातोश्री तर अॅड. आकांक्षा दांडगे यांच्या आजी होत.

दरम्यान, केशरबाई दांडगे यांच्या निधनाने लोणी काळभोर सह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील स्मशानभूमीत आज बुधवारी (ता. २२) अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!