Latest Marathi News
Ganesh J GIF

कोंढव्यातील तिहेरी हत्याकांडामुळे पुणे हादरले

खुनानंतर तिघांना घरातच जाळले, अनैतिक संबंधाच्या संशयातून दिरानेच केली हत्या

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यातील कोंढवा भागात दोन चिमुकल्यांसह तिच्या आईचा चुलत दिराने खून करून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिराने अनैतिकच्या संशयातुन हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळता कोंढवा पोलिसानी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आम्रपाली वाघमारे, रोशनी, आणि आदित्य अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर आरोपी वैभव वाघमारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चुलत दीर व आम्रपाली हे मूळचे लातूरचे आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. आम्रपाली यांचा विवाह झालेला होता. पण प्रेमकरणामुळे त्या चुलत दिरासोबत पुण्यात पळून आलेल्या होत्या. कोंढवा येथील पिसोळी भागात ते राहत होते. वैभव याला आम्रपालीचे दुसऱ्याशी संबंध आहेत असा संशय होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होता. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला त्यामुळे चिडलेल्या वैभवने प्रथम आम्रपाली यांना ठार मारले. त्यानंतर दोन्ही मुलं रडत असल्याने त्यांचा गळा दाबून संपवले, आणि नंतर तिघांना घराच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये नेऊन, घरातील कपडे व लाकडे गोळा केली आणि तिघांना जाळून टाकले. या तिहेरी हत्याकांडामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार समोर येताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पसार झालेल्या दीर याचा शोध घेऊन पकडले. समीर साहेबराव मसाला याने फिर्याद कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!