Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बघा गाैतमी पाटीलचे उत्तर काय?

गाैतमी पाटील आवडते आयपीएलमधील ही टिम, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- आयपीएल सुरु असल्यामुळे सगळीकडे त्याची क्रेझ चालु आहे आणि त्यामध्ये आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील चर्चेत आली आहे. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या क्रिकेट प्रेमाविषयी माहिती दिलीय.


That Odd Engineer या युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत गौतमीला तिच्या आवडत्या आयपीएल टीमबाबत प्रश्न विचारण्यात आला तसेच आवडत्या खाद्यपदार्थाबाबत देखील तिला विचारण्यात आलं. गौतमीला पुरणपोळी की तांबडा पांढरा? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला गौतमीनं पुरणपोळी असं उत्तर दिलं. विराट कोहली की धोनी? असा ही प्रश्न या मुलाखतीत गौतमीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर गौतमीनं धोनी हे दिलं. मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपरकिंग्स यापैकी आयपीएलमधील आवडता संघ कोणता? असाही प्रश्न गौतमीला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर गौतमीनं मुंबई इंडियन्स असं दिलं. गौतमीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.That Odd Engineer च्या या रॅपीड फायर राउंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर तू निर्लज्जासारखा व्हिडीओ काढशील याचा तुझ्या घरातील व्यक्तींना त्रास होणार नाही. ज्या मुलाचा व्हिडीओ तू काढतोय, तिला त्रास होणार आहे. हे कर्म आहे. त्यांनी इथेच फेडावं लागेल.’ असा इशारा तिने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला दिला आहे.

यावेळी तिला रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, असा प्रश्न विचारण्यात आला. तिला दोन्हीपैकी एक नाव निवडायचं होतं. पण तिने त्यावर उत्तर देणं टाळलं. तसेच ‘तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार’, असं ती हसत अँकरला म्हणाली. गाैतमीचा घुंगरु चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!