Latest Marathi News

पुण्यातील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडेंचे ‘यामुळे’ निलंबन

ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये जिंकणे झेंडेच्या अंगलट, या नियमाचा केला भंग, आनंदावर विरजण, चाैकशीचा ससेमिरा

पुणे दि १८(प्रतिनिधी)- ड्रीम ११ वर कोट्यवधी जिंकणारे पिंपरी – चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऑन ड्युटी ड्रीम ११ हा ऑनलाइन गेम खेळणं झेंडे चांगलंच महागात पडले आहे. त्यांची एक चूक त्यांना यावेळी महागात पडली आहे.

क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी सोमनाथ झेंडेंनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली. त्यात ते टाॅपला राहिले. त्यामुळे त्यांना दीड कोटींचे बक्षीस मिळाले होते. आठवडाभरापुर्वीच ही घटना घडली होती. पण हा उत्साह त्यांना काहीकाळच उपभोगता आला होता. कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत झेंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घेतली होती. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका सोमनाथ झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांनी कोणत्याही खेळ प्रकारात सहभाग घेण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी झेंडे यांनी घेतली नव्हती. तसेच यांचे आर्थिक उत्पनाचे साधने कायदेशीर असावेत असा नियम आहे. त्यामुळे झेंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याचबरोबर झेंडे यांनी बक्षीस जिंकल्यानंतर झेंडे यांनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली आहे. आता झेंडे यांची चाैकशी केली जाणार आहे. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचे म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात येणार आहे. दरम्यान झेंडे यांच्यावर याआधीही एक आरोप करण्यात आला होता.

प्राथमिक चौकशीनुसार पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना निलंबित केले आहे. पोलीस उपायुक्त बापू बांगर विभागीय चौकशी करणार आहेत. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी सतिश माने यांनी दिली आहे. झेंडे यांची नियुक्ती साईड ब्रँच असलेल्या आरसीपी (दंगा नियंत्रण पथक) येथे झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!