Just another WordPress site

पुण्याचा शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी

महेंद्र गायकवाडला दाखवलं अस्मान, दोन्ही पैलवान होणार मालामाल

पुणे दि १४(प्रतिनिधी) – पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून अंतिम फेरीत पोहोचला होता.शिवराजने महेंद्रला चीतपट केले आणि ६५ व्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.

GIF Advt

सेमी फायनलमध्ये माती विभागातून पैलवान महेंद्र गायकवाडने पैलवान सिंकदर शेखचा पराभव केला. तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी कडवी झुंज यला मिळाली. मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेत्या महेंद्र गायकवाड हे दोघंही मालामाल होणार आहेत. विजेता आणि उपविजेत्या अशा दोघांनाही बक्षिस देण्यात येणार आहे. केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोख ५ लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान शिवराज राक्षेवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!