Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्याचा जागतिक विक्रम! PMRDA ने अवघ्या ९५ दिवसांत उभी केली १४ मजली इमारत; खाजगी बिल्डर्सही झाले थक्क

मोठ्या मोठ्या शहरात उंच इमारती उभा राहण्यासाठी अनेक वर्ष जातात. आपण कुठल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केल्यानंतर त्या घराचा आपल्याला ताब्या मिळेपर्यंत अनेक तारखा मिळत असतात.मे महिन्यात घर मिळलं असं सांगतात आणि नंतर ही तारखे अजून पुढे जाते आणि असं करता करता पाच सहा काय अगदी आठ महिने आपल्याच घराचा ताब्या मिळण्यासाठी वेळ लागतो. पण पुण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) बांधकाम क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पात केवळ 95 दिवसांत 14 मजली इमारत यशस्वीरित्या उभारलंय. विशेष म्हणजे या ऐतिहासिक कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आलीय. देशातील ही पहिलीच घटना असल्याने PMRDA ने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एवढंच नाही तर या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सोबत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली आहे.

या इमारतीच्या बांधकामात अत्याधुनिक आणि सुरक्षित अशा थ्री एस प्रि-फॅब तंत्रज्ञानाचा वापरण्यात आला. बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष योगेश काजळे यांनी सांगितलं की, चिखली परिसरात या प्रकल्पात जवळपास 6 हजार घरांसाठी 40 हून अधिक इमारतींचे बांधकाम थ्री एस प्रि-फॅब या तंत्रज्ञानानेच बांधण्यात आला आहे.विशेष म्हणजे जलद बांधकामासाठी PMRDA ने कामाच्या गुणवत्तेकडे आणि घराच्या सुंदरतेकडे दुर्लक्ष केलं नाहीय. पीएमआरडीएच्या अधिकारी रिनाज पठाण यांनी सांगितलं की,इतक्या कमी वेळात भव्य इमारत उभी राहणे ही अभिमानास्पद बाब आहे. ‘पीएमआरडीए’ने यापूर्वीचा आपलाच 100 दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढत बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!