‘माझ्या आईला तुरुंगात टाका’ ‘हा’ चिमुकला असा का म्हणाला
सोशल मिडीयावर लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल,बघा नक्की काय घडलं
भोपाळ दि १८(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर प्राण्यांचे व्हिडीओ असतात.सध्या व्हायरल झालेल्या व्हिडोओत मुलगा त्याच्या आईबाबतची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आला आहे.
व्हिडिओत आई त्याला कसा त्रास देते हे अगदी निरागस पद्धतीने सांगितले आहे.त्याची तक्रार ऎकून महिला सब-इन्स्पेक्टरलाही हसू आवरता आले नाही. आता पोलीस ठाण्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याने केलेली तक्रार ही जिल्हा मुख्यालयापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. बुरहानपूर जिल्ह्यातील देडतलाई गावातील हा चिमुकला आहे ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुलाची आई त्याला अंघोळ घालत होती. आणि हा मुलगा मस्ती करत होता आंघोळीचं पाणी इकडेतिकडे उडवत होता शेवटी आई वैतागून त्याला मारू लागते याचा त्याला इतका राग येतो कि, थेट आपल्या बाबांकडे तो आईची तक्रार करतो एवढंच नाही तर वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन येतो आणि आईची तक्रार करतो.

चिमुकल्याने केलेली गौंडस तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू आवरले नाही. त्यांनी या मुलाची तक्रार घेऊन कारवाईचं आश्वासन दिले आहे. त्याच्या या तक्रारीनंतर आई आपल्या मुलांना मारताना हजारदा विचार करेल कारण मुलाने पोलीस स्टेशनमध्ये जात तक्रार केली तर मग काय करणार पण हा व्हिडिओ पाहुन अनेकांचे मनोरंजन होत आहे.