Latest Marathi News
Ganesh J GIF

‘पुणे तुंबत नाहीये तर पाऊस जास्त पडतोय….’

पावसाच्या बॅटिंगनंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुणे शहरात सोमवारी रात्री धुमाकूळ घातलेला पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. शहराच्या आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगामुळे हा पाऊस झाला असून, त्याने शहरातील व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवला. त्यामुळे सोशल मिडीयावर मिम्सचा पूर आला होता.

वेगवेगळ्या विषयांवरील मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.आता काही नेटकऱ्यांनी काल पुण्यात झालेल्या पावसावर देखील भन्नाट मिम्स तयार केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या रुपया कोमजोर होत नसून डाॅक्टर मजबूत होतोय या वाक्याचा आधार घेत पुणे तुंबत नाहीये तर पाऊस जास्त पडतोय असे म्हणत सत्ताधारी भाजपाला टोला लगावला आहे. तर काहींना पुण्यातील मुसळधार पाऊस नेहरूंची चूक असल्याचे सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही या विधानाला टॅग करत मुंबईतील भाजपाच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

तर काहींनी पावसाला बस की आता म्हणत कविता केल्या आहेत. तर एका युजरने एक दिवसाच्या ब्रेकनंतर पुणेकर पावसाला म्हणताता…’ असं कॅप्शन देऊन एक मिम सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे.

तर मोर ही आता पाऊस आल्यावर आपण नाचणार नसल्याचे सांगत आहे. तर काहींनी फडणवीसांना नवपुण्याचे शिल्पकार म्हटले आहे. तर काहींना हाॅलीवूडच्या चित्रपटाचे डायलाॅग शेअर केला आहेत.

दरम्यान पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पमुळे सध्या पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास काही विलंबाने होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!