Latest Marathi News
Ganesh J GIF

‘राज ठाकरे मुंबईत येऊन तुझी हेकडी बाहेर काढेन’

बिहारच्या 'या' खासदाराची राज ठाकरेंना धमकी, राज ठाकरेंवर टिका करताना उद्धव ठाकरेंची मात्र स्तुती

पटना – मराठी भाषेवरून राजकीय तणाव वाढलेला असताना बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद होण्याची शक्यता आहे.

मुंबईत येऊन राज ठाकरे यांना धडा शिकवण्याचा इशारा राज ठाकरे यांना पप्पू यादव यांनी दिला आहे. माध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. राज ठाकरे त्यांच्या पोकळ धमक्या आणि अहंकाराने त्यांचा अपमान करू शकत नाहीत. ‘राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करतायत. मी राज ठाकरेंना आव्हान देतोय, त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन!’ असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे. ‘आज पत्रकार परिषदेत मी उद्धव ठाकरे यांचे नाव चुकून घेतले. मी त्यांचा मनापासून आदर करतो. भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरे जी गुंडगिरी करत आहेत, ती मी चालू देणार नाही! प्रत्येक राज्याच्या प्रादेशिकतेचा आदर करायला हवा. पण जर त्यांनी आमच्या बिहारमधील लोकांवर त्याच्या नावाने हल्ला केला तर आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. पप्पू यादव यांनी, मराठीच्या मुद्यावर मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदर येथे केलेल्या एका व्यापाऱ्याला मारहाणीवरून नाराजी व्यक्त केली आहे. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा समोर आल्यानंतर राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचं ठरवलं, तसेच मराठी भाषिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येलाच फडणवीस सरकारने जीआर रद्द केला. दरम्यान, या प्रकरणानंतर राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं आहे.

https://x.com/pappuyadavjapl/status/1941058693874765917?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1941058693874765917%7Ctwgr%5Efaa2aa126170ce446d518bab05bae5e3fad6f0cd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

मीरा भाईंदरमध्ये मराठीत न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला होता. त्यानंतर परिसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला होता. तेंव्हा पासून मराठी विरूद्ध अमराठी वाद महाराष्ट्रात वाढलेला दिसून येत आहे. तसेच याला राजकिय वळण मिळाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!