Just another WordPress site

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रिपद ? राज ठाकरे नेमक काय म्हणाले…? ही बातमी नक्की बघा…!

मुंबई प्रतिनिधी – शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात कोण असणार ? कोणाला संधी दिली जाणार? यात अनेक नावे पुढे येत आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील मंत्रीपदाची ऑफर आल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे नव्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरे देखील असणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या.

GIF Advt

भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन स्वतःकडे उपमुख्यमंत्री ठेवले आहे.त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी सभागृहात भाजपच्या बाजूने मतदान केल्यानंतर भाजप सेनेला आणखी एक धोबीपछाड देण्यासाठी नवीन डाव टाकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता राज ठाकरेंकडून याबाबत खुलासा करण्यात आल्याचे समजते. राज ठाकरेंनी स्वतः अमित ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबतच्या बातमीचे खंडन केलॆ आहे त्यामुळे अमित ठाकरेंच्या मंत्री पदाबाबतची मोठी चुकीची असल्याचे स्पष्ट झालं आहे. ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरण निर्मिती करत असल्याचे राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बुधवारी भेट होणार होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. नव्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!