Latest Marathi News
Ganesh J GIF

राजु शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार

राजु शेट्टींनी मोठी घोषणा, सहा मतदारसंघही ठरले, आघाडीसोबत युतीचीही चिंता वाढली

कोल्हापूर दि २२(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरीही आत्तापासुनच त्याची तयारी सुरू झाली आहे. युती आघाडी यांच्यात जागावाटपाचे गु-हाळ सुरु असतानाच राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून आता कुणाच्या वळचणीला जायचं नाही, असा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. शाहूवाडी येथे सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबिरात हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना २०१४ साली युतीसोबत तर २०१९ साली आघाडीसोबत निवडणुकीला सामोरे गेली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून हातकणंगलेसह राज्यातील पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर नेमक्या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गट यांना पश्चिम महाराष्ट्रात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही कडून शेट्टींबरोबर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आमचा सरकारशी सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. आम्ही मांडलेला हमीभावाचा कायदा अजून प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही.अशी टिका राजू शेट्टी यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!