राज ठाकरे लवकरच सुरु करणार वृत्तपत्र सिनेमाही काढणार
गुढीपाडवा मेळाव्याकडे लक्ष,स्वबळावर लढणार का युतीची गुढी उभारणार?
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत. पण त्याआधीच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्या कायमच चर्चेत राहणारे राज ठाकरे हे नाव आता दोन वेगवेगळ्या क्षेत्रात देखील झळकणार आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबतचं विधान केलं आहे.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली.यावेळी त्यांना वर्तमान पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले “मला स्वतःच वर्तनमान पत्र काढायचं होतं. मात्र जाहिरातीवर सर्व अवलंबून असतं”, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. पण मला वर्तमान पत्र काढायचं आहे, असे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत.त्यानंतर राज ठाकरेंना चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी मी चित्रपट निर्मिती करतो. कथा पटकथा माझी असेल, असं स्पष्ट केलं. काही वर्षापूर्वी देखील आचार्य अत्रे यांचे मराठा हे दैनिक राज ठाकरे पुन्हा सुरु करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. राज ठाकरे या मेळाव्यात पुन्हा एकदा भोंग्याबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणूका स्वबळावर लढणार कि विजयाची गुढी उभारणार याचीही उत्सुकता असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कोणावर घणाघात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांचा मेळावा पार पडत असताना मनसेने पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचले आहे. शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. हे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.