Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमध्ये लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

तरुणीला 'हे' कारण देत लग्नास नकार, अश्लील फोटो काढत केले संतापजनक कृत्य

पुणे दि ४(प्रतिनिधी)- हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात केला शिवाय ती अनुसूचित जातीच्या असल्याचे कारण देत लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या नंतर तरूणीने हडपसर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी तरुणीच्यस तक्रारीनंतर मिलिंद बाळासाहेब भोईटे आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हडपसरमध्ये रहाते. आरोपी आणि तिची ओळख होती. आरोपीलस फिर्यादी तरुणी अनुसूचित जातीच्या आहे हे माहिती असुनही लग्नाचे आमिष दाखवत जवळीक साधली. त्यानंतर तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत तिलस वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यस इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले. तसेच अश्लील फोटो देखील काढले.ते त्याने एका महिलेला पाठवले.त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात केला. तिने लग्नाचा तगादा लागल्यानंतर आरोपीने ती अनुसूचीत असल्याचे कारण देत लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलीसांनी आरोपी मिलिंद भोईटे आणि एक रविना नावाची महिला या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील हडपसर आणि बाणेर परिसरात घडला आहे. त्यांच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सहायक पोलीस आयुक्त देसाई अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!