Latest Marathi News

रॅपर बादशाह या सुंदर अभिनेत्रीच्या पडलाय प्रेमात

वर्षभरापासून करतोय 'त्या' अभिनेत्रीला डेट, बघा कोण आहे ती अभिनेत्री

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भारतातील प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह गेल्या वर्षभरापासून एका अभिनेत्रीला डेट असल्याची माहिती पुढे आली आहे. ते लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. बादशाह दोन वर्षांपूर्वी पत्नी जस्मिनपासून वेगळा झाला होता. तेंव्हापासून तो या अभिनेत्रीला डेट करत आहे.

बादशाह सुंदर पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीला डेट करत आहे. या दोघांची भेट एका मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सध्या ते एकमेकांना डेट करत आहेत. ईशा रिखी ही बॉलीवूड पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे. रेमो डिसुझा त्याच्या ‘नवाबझादे’ या चित्रपटातून ती बाॅलीवूडमध्ये पदार्पन करणार आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.बादशाहने आपल्या या रिलेशनशिपबाबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही कल्पना दिली आहे. आणि त्याचे घरचेही या रिलेशनशिपबाबत खुप खुष आहेत. तथापि, बादशाह स्वतःच्या खासगी आयुष्याची फारशी चर्चा करत नाही. पहिल्या पत्नीशी वादानंतर तो डिस्टर्ब झाला होता. पण आता तो ईशाच्या रिलेशनमध्ये आल्यानंतर खूष आहे. काही दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सची वेबसीरीज ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाईव्हज’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये बादशाह दिसून आला होता. दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही निर्णय घाई गडबडीत घ्यायचा नाही.त्यामुळे त्यांनी रिलेशनमध्ये असल्याबद्दल अधिकृतपणे सांगितलेले नाही.

रॅपर बादशाहने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर बादशाहची मोठी फॅन फॉलोईंग आहे. बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात २००६ मध्ये केली होती. पण त्याला खरी ओळख’अभी तो पार्टी शुरु हुई है’ या गाण्यामुळे मिळाली होती.बादशाहला त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही. तो आपलं पर्सनल लाईफ लाईमलाईटपासून दूर ठेवणं पसंत करतो.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!