Just another WordPress site

पुणे पोलिसांच्या खाकी वर्दीतील गोड आवाज ऎकला का?

पोलीसाच्या आवाजावर नागरिकांचा काैतुक वर्षाव, हा व्हिडिओ नक्की बघा

पुणे दि १३(प्रतिनिधी)- आपल्या सर्वसामान्यांचे रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतील काही लोकांचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे ते प्रोफेशनल नसले तरीही त्यांच्या आवाजातील सतत ऐकत बसावे असे वाटते. पुणे पोलीसांनी असाच एक खाकी वर्दीतील गोड आवाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पुणे पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. घोरपडे आपल्या गोड आवाजासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक गाणी गायले आहेत. अरिजित सिंगच्या आवाजातील देश मेरे गाणे घोरपडे यांनी खाकी वर्दी घालून गायले आहे. खाकी गर्दीमुळे त्या आवाजात देशप्रेमाचा प्रत्यय वारंवार येत आहे. सर्वसामान्यांचे रक्षण या पोलीसांनी देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांना हे गाणे समर्पित केले आहे. देशाप्रती गाणे समर्पित करण्यासाठी विशेष दिवसाची गरज भासत नाही असे कॅप्शन देत हे गाणे शेअर केले आहे. या गाण्याला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. सागर घोरपडे यांच्या सुमधूर व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून त्यांच्या गायनाचे कौतुक केले आहे.

GIF Advt

सागर गायकवाड यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी आपली खाकी वर्दी घालून आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना हे गाणे समर्पित केल्यामुळे अनेकांनी त्यांचे काैतुक केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!