Latest Marathi News

नव्या प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या जुन्या प्रियकराचा काढला काटा

लाईन बॉय विजय ढुमेच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश, प्रेमाच्या त्रिकोनातून झाली हत्या, आरोपी ताब्यात

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयता गँगने तर पुणे शहरात हैदोस घातला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती. अखेर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

विजय ढुमे खून प्रकरणी पोलीसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सुजाता समीर ढमाल, संदीप दशरथ तुपे, सागर संजय तुपसुंदर, प्रथमेश रामदास खंदारे आणि त्यांच्या अजून एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने विजय ढुमे याचा त्याच्याच प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने खून करत काटा काढला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी सिंहगड पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपसाले. त्यावेळी सुजाता या महिलेचे ढुमे यांच्याशी जुने प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीसांनी तिची चाैकशी केली. यावेळी तिने तिचा नवीन प्रियकर संदीप दशरथ तुपे याच्यासोबत ढुमेच्या हत्येचा कट रचल्याचे मान्य केले. अखेर पोलीसांनी तुपेलाही ताब्यात घेतले. संदीप तुपे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर टेंभुर्णी, इंदापूर आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान विजय ढुमेचे गेल्या १३ वर्षापासून सुजाताबरोबर प्रेमसंबंध होते. पण त्यांच्यात वाद होऊ लागल्याने तिला हे प्रेमसंबंध संपवायचे होते. तसेच सुजाताला बाउन्सरची नोकरी करायची होती. त्यामुळे तिने सोशल मिडीयावर ओळख झालेल्या तुपेच्या मदतीने ढुमेचा खून केला. पण पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलीस फौजदार आबा उतेकर, यांच्यासह पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. आता या आरोपींना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!