
‘तू आमच्यासाठी काही करशील तरच तुला सिनेमात संधी देव’
या अभिनेत्री सांगितली बाॅलीवूडची काळी बाजू, दोनदा आला कास्टिंग काऊचचा अनुभव म्हणाली निर्मात्याने माझ्याकडे...
मुंबई दि १(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये जसे ग्लॅमर आहे. तसे त्याची काळी बाजू देखिल आहे. अनेकदा कलाकार याचा सामना करतात. काही जण व्यक्त होतात. तर काही जण गप्प राहणे पसंत करतात. कास्टिंग काऊच हा बाॅलीवूडचा आणखी एक विद्रूप चेहरा आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आतापर्यंत कास्टिंग काउचशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता आणखी एका अभिनेत्रीने आपला याबाबतचा भयानक अनुभव सांगितला आहे.
बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इशा गुप्ताने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. तिला चक्क दोनवेळा याचा सामना करावा लागला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ईशाने याबाबत खुलासा केला. ती म्हणाली, एक चित्रपट अर्धा पूर्ण झाला होता. पण त्यानंतर निर्मात्याने तिच्याकडे अनपेक्षित मागणी केली जी खुपच भयानक होती. तू आमच्यासाठी काही करशील तर तुला सिनेमात संधी देवू अशी अटच त्या निर्मात्याने घातली. पण त्याला नकार दिल्यानंतर ईशाला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. दुसरा अनुभव सांगताना ती म्हणाली की, दोन लोकांनी कास्टिंग काऊचचा सापळा रचला होता. मला खुप भीती वाटत होती. त्यामुळे मी माझ्या मेकअप आर्टिस्टला माझ्या खोलीत झोपायला बोलावल. तसेच मला तेव्हा त्यांच्या हेतूबद्दल कळालेप होते. तरी देखील मी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला होता. असे देखिल इशाने सांगितले आहे. दरम्यान इशा गुप्ता सध्या कोणताही चित्रपट करत नाही. पण ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात.
ईशा गुप्ताने २०१२ मध्ये ‘जन्नत 2′ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती शेवटची आश्रम वेबसिरिजच्या सीझन 3’ मध्ये दिसली होती. तसेच अलीकडेच महिला विधेयक मंजूर झाल्यानंतर तिने निवडणुक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. त्याचीही त्यावेळी चर्चा झाली होती.