Latest Marathi News
Ganesh J GIF

नागपूरात नागरिकांना मुसळधार पावसामुळे पुराचा फटका

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 'ऑन फिल्ड', पूरपरिस्थितीचा घेतला आढावा, मदतकार्य सुरु

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कटून टाकले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून भाग जलमय झाले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या वातावरणात नागरिकांना दिलासा, मदतीसाठी जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहाटेपासूनच पुढाकार घेतला आणि शहरात विविध घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाशी चर्चा करून तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पावसामुळे नागपूरकर अडचणीत असल्याचे कळताच बावनकुळे यांनी नागपूर, मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती कळविली. नागपूर शहरातील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांना व माजी नगरसेवकांना नागरिकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासोबत अंबाझरी, झासी राणी चौक, मोरभवन व इतर सखल भागांची पाहणी केली व नागरिकांची मदत करण्याचे आवाहन केले. मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’(सीओसी) येथे मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांच्यासह बावनकुळे यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले. जलमय झालेल्या वस्त्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य करण्याचे व त्यांना अन्न व त्याच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याच्या सूचना केल्या. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहरातील सर्व भासपा पदाधिकारी, माजी नगरसेवस्क, सामाजिक कार्यकर्ता, काही सामाजिक मंडळाच्या प्रतिनिधीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन संवाद साधला. भोजन, निवारा, कपडे, अंथरुणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई भेट असल्याने, त्यासाठी बावनकुळे मुंबई येथे उपस्थित राहणार होते. मात्र नागपुरातील घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन बावनकुळे यांनी मुंबई दौरा रद्द केला आणि दिवसभर नागपूरला मदतकार्य केले. त्यांनी अमित शहा यांच्याशी संपर्क करून शहा यांना याबद्दल अवगत केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!