आमदारकीसाठी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा पण..
सरकारकडून उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा मंजूर, पण पक्षाकडून हा आदेश, कोण आहेत उपजिल्हाधिकारी
भोपाळ दि २८(प्रतिनिधी)- अनेक तरुण तरुणींचे आयएएस होण्याचे स्वप्न असते. पण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी सुट्टी न दिल्याचे कारण देत राजीनामा दिला होता. आता त्यांचा राजीनामा मध्य प्रदेश सरकारने स्वीकारला आहे. एका सरकारी आदेशात म्हटले आहे की, राज्य सरकारने छतरपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांचा शासकीय सेवेतून राजीनामा स्वीकारला आहे. पण बांगरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, त्यानंतर आम्ही विचार करू असा निर्णय पक्षाने घेतला आहे. निशा बांगरे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना आमला मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण निशा बांगरे यांनीही निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. निशा बांगरे कमलनाथ यांची भेट घेत चर्चा केली आहे. छिंदवाडा येथील जाहीर सभेत कमलनाथ बांगरे यांना काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देणार आहेत. कमलनाथ निशा बांगरे यांना उद्देशून म्हणाले,’ तुम्ही निवडणूक लढवत नाही आहात, पण मला तुमच्या सेवेची राज्यात गरज आहे. ज्या महिलांवर अत्याचार झाला, त्या महिलांनाही परत आणण्याची जबाबदारी निशा बांगरेंची असेल. भविष्यात तुम्ही एक सर्वात मोठे उदाहरण व्हाल. असे ते म्हणाले आहेत. निशा बांगरे यांनी छत्तरपूरच्या उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आमला जागेवर काँग्रेसने उमेदवार उभा करताच दुसऱ्याच दिवशी सरकारने निशा बांगरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. निशा बांगरे यांना बैतुल जिल्ह्यातील आमला या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती.
बैतुल जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा बांगरे यांनी शिवराजसिंह चौहान सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेचे काँग्रेसने समर्थन केले होते. तेव्हापासून त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण अखेर निशा बांगरे यांचा पत्ता कट झाला आहे.