या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली रस्त्यावर भीक मागण्याची वेळ
चोरी करताना पोलीसांनी केली अटक, जेवण मिळणेही मुश्कील, अभिनेत्री मनोरुग्णालयात दाखल
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. अनेक जण ते अनुभवत असतात. सध्या असेच एका अभिनेत्रीला आपल्या आयुष्यात आलेल्या अपयशामुळे थेट चोरीचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे त्या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे.
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मिताली शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. इतकंच नाही तर ती एकेकाळी सगळ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांची पहिली पसंत होती. पण मध्यंतरी काही चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर मात्र तिला चित्रपट मिळणे बंद झाले. त्यामुळे मिताली चक्क मुंबईतील लोखंडवालाच्या रस्त्यावर भीक मागू लागली होती. त्याचबरोबर सुमारे ७ वर्षांपूर्वी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या दोन महिला पोलिसांनी तिला अटक केली होती. महिला पोलिसांनी तिला हातकडी लावताच मितालीने आधी शिवीगाळ केली आणि नंतर चावा घेतला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिताली शर्मा ही मूळची दिल्लीची असून तिने भोजपुरी चित्रपटांसोबत मॉडेलिंग असाइनमेंटही केली आहे. इतर सर्वांप्रमाणे मितालीचेही हिरोईन बनण्याचे स्वप्न होते आणि म्हणूनच ती आपले कुटुंब सोडून नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. त्याच्या हट्टीपणामुळे नंतर तिच्या घरच्यांनीही तिला सोडून दिले. त्यामुळे ती आपल्या हालाखीच्या काळात घरी देखील जाऊ शकली नव्हती. पैशांच्या कमतरतेमुळे मिताली डिप्रेशनची देखील शिकार झाली होती.
काही वर्षापूर्वी पोलिसांनी तिला पकडून पोलीस ठाण्यात आणले, तेव्हा मितालीने सर्वप्रथम तिला जेवण देण्याची विनंती केली होती. तिची प्रकृती लक्षात घेऊन पोलिसांनी तिला ठाण्यातील मानसिक आश्रयस्थानात दाखल केले होते आणि आता ती कुठे आहे याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण आयुष्यात चढ उतार किती बिकट अवस्था करत असतात. असे दिसून आले आहे.