
सोलापुरात दिवसाढवळ्या रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी
काडादींनी भररस्त्यात दाखवले केतन शहांना रिव्हॉल्वर, व्हिडिओ व्हायरल
सोलापूर दि २७(प्रतिनिधी)- सोलापूरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गेल्या २१ दिवसांपासून चक्री उपोषण करण्यात येत आहे.विकास मंचचे केतन शहा यांनी काडादी यांना आरोपी संबोधल्यामुळे धर्मराज काडादी यांनी शहा यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत धमकावले आहे.
सोलापूर विकास मंच विमानसेवा सुरु करण्यासाठी आग्रही आहे.पण सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणीचा वाद यानिमित्ताने पेटला आहे. या विषयावर विकास मंचच्या सदस्यांनी महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली-उगले यांची भेट घेत ‘श्री सिद्धेश्वर मंदिरात आपण फोटो का काढलात, ते आरोपी आहेत’ असे केतन शहा आयुक्तांना म्हणाले होते. केतन शहा यांच्या ‘आरोपी’ या शब्दावर भडकलेल्या धर्मराज काडादी यांनी उपोषणस्थळ गाठत “तू जर माझ्याबरोबर वैयक्तिक जास्त शहाणपणा केलास तर गोळ्या घालतो तुला,’ असे म्हणत काडादी यांनी खिशातील रिवॉल्व्हर काढून दाखवले. यावर केतन शहा यांनीही, ‘गोळ्या घाला तुम्ही, हरकत नाही; पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. तुमच्याकडे बंदुकीचे लायन्सस आहे, असे उत्तर दिले.त्याव काडादी यांनी‘अरे वेडा आहे का, किती सहन करायचं. मूर्ख आहे का. मला दोन मिनिटं वेळ लागत नाही. वेळ तशी आणलास तर तसंही करतो,’ असं म्हणत धमकी दिली आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
काडादी यांनी धमकावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याविषयी विचारविनिमय सुरू आहे, असे सोलापूर विकास मंच सदस्य केतन शहा यांनी सांगितले आहे. तर सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक काडादी यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.पण आगामी काळात हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.