Latest Marathi News
Ganesh J GIF

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडत बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, या वादातुन जीवघेणी मारहाण

हिंगोली दि २७(प्रतिनिधी)- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून ही मारहाण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रामकिसन हराळ असे या मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जागेच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला तत्काळ सुटका करत याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या आरोपींना अटक देखील झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.पण मारहाणीची घटना सहा दिवसापूर्वी झाली होती अशी माहिती आहे. जमिनीच्या वादातुन मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पण आणखी कोणते कारण आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने मारहाणीच्या, हत्येच्या, बलात्काराच्या,खुनाच्या घटना समोर येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!