Just another WordPress site

ही अभिनेत्री लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

महिला वर्गात आनंदाचे वातावरण, पहा कोणती आहे ती मालिका

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- तुमच्यासाठी कायपण हा डायलाॅग ज्या मालिकेतील आहे ती मालिका म्हणजे देवयानी. डेली सोप हा प्रकार उदयास आल्यानंतरदेखील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘देवयानी’. प्रेक्षकांसाठी म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहे. त्यामुळे महिला वर्ग खुश आहे.

GIF Advt


स्टार प्रवाहवर १० वर्षांपूर्वी गाजलेली मालिका म्हणजे ‘देवयानी’. रात्री ८. ३० वाजता ही मालिका वाहिनीवर प्रसारित व्हायची. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. या मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. देवयानी, संग्राम, आबासाहेब अशी पात्रे प्रसिद्ध होती. संग्रामचा ‘तुमच्यासाठी काही पण’ हा डायलॉग खूप प्रचलित झाला होता. या मालिकेची लोकप्रियता पाहता वाहिनीने या मालिकेचे पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाहने प्रेक्षकांसाठी कायपण म्हणत मालिका पुन्हा सुरु केली आहे. वाहिनीने आपल्या इन्स्टाग्रामवर देवयानी मालिका पुन्हा प्रसारित होणार अशी माहिती दिली आहे. आई कुठे काय करते’, ‘या फुलाला सुगंध मातीचा’ स्टार प्रवाहवरील या मालिका आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यात आता देवयानी मालिका सामील होणार आहे.

या मालिकेत शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, नागेश भोसले, देवदत्त नागे, माधव देवचके, भाग्यश्री मोटे असे दिग्गज कलाकार या मालिकेत होते. ही मालिका १८ डिसेंबर पासून संध्याकाळी ४.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होईल. वाहिनीच्या या निर्णयाने या मालिकेचे चाहते नक्कीच खुश होतील.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!