बँकेवर दरोडा टाकत दरोडेखोरांनी मारला ‘याच्या’वर डल्ला
दरोडा पाहून पोलीसही हैराण, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
उत्तर प्रदेश दि २७(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहे. यात चोरट्यांनी एका बँकेवर दरोडा टाकला खरा पण चोरट्यांनी ज्याची चोरी केली आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा डोक्यावर हात माराल ही अनोखी चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अजब चोरीची गजब घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काही दरोडेखोरांनी बँकेच्या सुविधा केंद्रात दरोडा टाकला. सुरुवातीला हे दरोडेखोर सामान्य ग्राहकांप्रमाणे बँकेत शिरले. पण संधी मिळताच त्यांनी आपले पिस्तुल बाहेर काढत कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन इंटरनेटचे राऊटर पळवले आहे. ही संपूर्ण घटना बँकेतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या अनोख्या चोरीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या चोरीमुळे बँकेचे नुकसान झाले नसले तरीही या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ही चोरी पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. दरोडेखोर बंदूक घेऊन बँकेत शिरले आणि राऊटर घेऊन पळाले. हे पाहून पोलिसही हैराण झाले. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.