Latest Marathi News

म्हणून पत्नीने केली पतीची शाॅक देऊन हत्या

पोलिसांच्या चाैकशीत धक्कादायक खुलासा, 'यामुळे' पत्नीचे बिंग फुटले

उत्तर प्रदेश दि २७(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाऱ्या पत्नीला अखेर पोलीसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरच्या कालिंदी कुंजमध्ये शिक्षकमित्र हरेंद्र शर्माच्या हत्येप्रकरणी हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नीला प्रियकरासोबत रहायचं होतं.त्यामुळे तिने पतीची हत्या केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हरेंद्र शर्माची पत्नी नेहा ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिची फेसबुकच्या माध्यमातून रवि नावाच्या बीटेक शिकणाऱ्या मुलासोबत झाली होती. दोघांमध्ये प्रेम झाले.दोघांनाही एकमेकांसोबत रहायचं होतं. पण हरेंद्र असताना हे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी हरेंद्रचा काटा काढण्याचा कट केला. घटनेच्या दिवशी नेहा आणि रविने आधी हरेंद्रला नशेचं काहीतरी खाऊ घातलं.जेव्हा त्याला नशा चढली तेव्हा त्याला विजेचा झटका देऊन मारले. पण नेहाने हरेंद्रचा मृत्यू हार्ट अटॅक झाल्याचा बनाव केला. पण कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांची चौकशी केली. त्या चौकशीतून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपी पती आणि तिचा प्रियकर याला अटक केली आहे. मृतकाला एक नशेचं औषध देण्यात आलं. त्यानंतर त्याला विजेचा झटका दिला. त्यात त्याचा मृत्यू झाला. पण हार्ट अटॅकनंतर अंतिम संस्काराची केलेल्या घाईमुळे पत्नी आणि तिचा प्रियकर यांचे बिंग फुटल्याने त्यांची रवानगी तुरूंगात झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!