Latest Marathi News
Ganesh J GIF

नियम मोडला पोलीसांनी पकडला, तो थेट गाणेच गाऊ लागला

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तरूणाने पोलीसांसमोर गायले गाणे, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पोलिसांकडून हेल्मेटशिवाय दुचाकी न चालवण्याचे आवाहन करण्यात येते. तरीही लोक वाहतूक नियमांना बगल देताना दिसतात. तरुणांकडुन सर्वाधिक वेळा नियम मोडले जातात.
सध्या अशाच एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने नियम मोडला आहे. पण व्हिडीओ फारच मजेशीर आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिसांना पाहताच तरुण बाईक थांबवतो. विनाहेल्मेट बाईक चालवल्यामुळे त्याला वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढणं कठीण असल्याचे जाणवल्यानंतर तो चक्क गाणे म्हणू लागतो. पोलिसांच्या कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी चक्क गाणं गायला सुरुवात करतो. शिवाय गाण्यातूनच तो आपली चूक झाल्याचेही कबुल करतो. विशेष म्हणजे स्वतः नियम मोडला असला तरीही तो आपल्या गाण्यात वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे सांगत आहे. त्यांचे हे गाणे रस्ता सुरक्षा नियमांशी संबंधित आहे.हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकप्रकारे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी पोलिस वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवतात असतात, पण त्याचा लोकांवर फारसा परिणाम होत नाही. असेच व्हायरल व्हिडिओतुन दिसत आहे.

नेटकरी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, भावा आता काहीही कर, पण तुझे चलान निश्चित झाले आहे. त्यामुळे तरुणाने कितीही गाणी म्हटलं तरी काही उपयोग होणार नसल्याचे म्हटले आहे. तर आणखी एक युजर म्हणतो की, चलन नक्की कापले जाणार त्यामुळे हा गमतीदार व्हिडिओ पाहुन बरेचजण हसणार यात शंकाच नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!