संजय राऊतांवर हक्कभंगासाठी सत्ताधारी आक्रमक पण…
गोगावले राऊतांना म्हणाले 'भाडखाऊ' आणि सभागृहाचे वारेच बदलले, बघा काय घडलं
मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने निर्माण झालेल्या राजकीय वादाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती.पण आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांविरोधात केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे बॅकफुटवर जावे लागले.
सभागृहात बोलताना भारत गोगावले म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आलाच पाहिजे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे भावना प्रचंड भडकत चालल्या आहेत. या माणसाला विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाने इतकंही भाडखाऊ नसलं पाहिजे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणा, असे भरत गोगावले यांनी म्हटले. पण त्यांनी असंसदीय शब्द वापरल्यामुळे बचावात्मक पवित्र्यात असलेले महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. गोगावले यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी विरोधकांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी राऊतांवरील हक्कभंगाच्या प्रस्तावाबाबत निर्णय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाले तेव्हा भरत गोगावले यांनी आपले शब्द मागे घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी जोरदार गदारोळ पहायला मिळाला.
भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे आक्रमक पवित्र्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांना ऐनवेळी नमते घ्यावे लागले. दरम्यान महाराष्ट्राचं विधानमंडळ हे देशातील प्रतिष्ठित आणि सर्वोत्तम विधानमंडळ आहे. आज आपण सर्वांनी मिळून याचा निषेध केला नाही तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील असे फडणवीस म्हणाले.