Latest Marathi News
Ganesh J GIF

सरन्यायाधीशांच्या त्या विधानामुळे शिंदे सरकार कोसळणार?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी अंतिम टप्प्यात,शिंदेचे टेन्शन वाढले

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. पण न्यायालयाने हे प्रकरण या आठवड्यात निकाली काढणार असल्याचे सांगितले आहे. पण प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेले विधान शिंदे गटाची चिंता वाढचणारे ठरणार आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच धोक्यात आले आहे.

बहुमत चाचणीच्या आधारे सरकार वैध असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात येत होता. त्यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की, “अपात्रतेबाबतचे मुद्दे ठरवणं हे बाकी आहेत, त्यावेळी राज्यपाल बहुमताची चाचणी त्याच मुद्द्यावर कशी काय करू शकतात? तसंच अपात्रतेची टांगती तलवार असतानाही आमदार मतदान कसे करु शकतात.” चंद्रचूड यांनी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांना विचारला आहे. यावेळी सरन्यायाधिशांनी १० व्या परिष्टिचा देखील दाखला दिला आहे. पक्षाअंतर्गत मुद्द्यावर देखील सरन्यायाधीशांनी निरिक्षण नोंदवताना
तुम्ही शिवसेना आहात की नाही हे बहुमत चाचणी ठरवू शकत नाही. ज्यावेळी सरकार बनलेलं असतं तेव्हा आम्हांला हा पक्ष नको असं सांगू शकत नाही. जर तुम्ही असं वागलांत तर तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात असा अर्थ होतो असे सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

सरन्यायाधीशांच्या या निरिक्षणामुळे शिंदे सरकारच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णयही वादात आढळण्याची शक्यता आहे. याशिवाय १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!