Latest Marathi News
Ganesh J GIF

कत्तलीसाठी जाणाऱ्या गाय, वासराची सुखरूप सुटका

५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे दि १२(प्रतिनिधी) – दौंड तालुक्यातील कडेठाण येथून बुधवार दि.८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्याकडून जनावरे विकत घेऊन ती जनावरे दौंड या ठिकाणी कत्तलीसाठी पाठवणार असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांना मिळाली होती. त्यांनी पाटस पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करत पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी गाई, वासरु आणि रेडकू अशी तीन जनावरे टाटा एस या टेम्पो गाडीमध्ये क्रूरपणे जखडून बांधलेल्या अवस्थेत दिसले.

त्यांना कसलीही चारा पाण्याची व्यवस्था केली नव्हती. व वाहन चालकाला ही जनावरे कोठे घेऊन चालला आहेस असे विचारले असता, ही जनावरे दौंड या ठिकाणी कत्तली साठी चालवली आहेत अशी माहिती मिळाली. सदर गायी, वासरू व रेडकू पोलिसांच्या मदतीने पाटस पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून, यामध्ये ३,००,००० रु किंमतीचा एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा इंट्रा टेम्पो क्रमांक एम.एच. ४२.एक्यू ५२०६ , तसेच १०,००० रु. किमतीची एक पांढऱ्या रंगाची गावरान गाय, १००० रु. किमतीचे एक पांढऱ्या रंगाचे गावरान वासरु व ३००० रु. किंमतीचे एक काळ्या रंगाचे रेडकु असा एकूण ३,१४,००० रु. किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, संतोष कांतीलाल ढोपरे, रावसाहेब चौधरी, लाला कासम कुरेशी, जमील कुरेशी व इम्रान कुरेशी ह्या ५ जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच ह्या पाळीव जनावरांना श्री बोरमलनाथ ट्रस्ट बोरीपारधी ता.दौंड जि.पुणे येथे सुखरूप सोडण्यात आले असून, यामध्ये पाटस पोलीस तसेच पत्रकार विकास शेंडगे, जय भंडलकर व निलेश टेंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!