महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर
'हे' असणार नवीन राज्यपाल, तेरा राज्यांचे राज्यपाल बदलले, पहा यादी
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत:ला आणि सरकारला सातत्याने अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. बैस याआधी
झारखंडचे राज्यपाल होते. वाजपेयी सरकारमध्ये बैस राज्यमंत्री देखील होते. दरम्यान विरोधकांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यानंतर नवीन राज्यापाल भाजपाच्या हातचे बाहुले नसतील अशी आशा व्यक्त केली आहे.बैस लवकरच सूत्रे संभाळतील.
देशभरातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.
राज्य व नवीन राज्यपाल
सिक्कीम : लक्ष्मण प्रसाद आचार्य
झारखंड : सी.पी. राधाकृष्णन
हिमाचल प्रदेश : शिव प्रताप शुक्ला
आसाम: गुलाबचंद कटारिया
आंध्र प्रदेश : माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर
छत्तीसगड : बिस्व भूषण हरिचंदन
मणिपूर : अनुसुईया उईके
नागालँड : एल.ए. गणेशन
मेघालय : फागू चौहान
बिहार : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
महाराष्ट्र : रमेश बैस