Latest Marathi News
Ganesh J GIF

सलमान खान या दक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट

सलमान पेक्षा इतक्या वर्षानी लहान आहे अभिनेत्री, या चित्रपटात एकत्र

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याच्या चर्चा आहेत. याआधी सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. आता तो दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वयाने २४ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला सलमान डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

पूजा हेगडे व सलमान खान डेटिंग करत असल्याच्या बातम्या अनेक वृत्त संस्थांनी दिल्या आहेत. परंतु, याबाबत अजून नेमकी माहिती समोर आलेली नाही. उमर संधू नामक ट्वीटर अकाऊंटवरुन सलमान खान व पूजा हेगडेचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. “ब्रेकिंग न्यूज, मेगा स्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात आहे. त्याच्या निर्मिती कंपनीकडून पूजाला दोन चित्रपटांची ऑफरही मिळाली आहे. ते एकमेकांना डेट करत आहेत. सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून ही माहिती मिळाली आहे” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटनंतर सलमान व पूजा डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पूजा हेगडे सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. दोघेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

सलमान खानच्या निर्मिती कंपनीकडून आलेली दोन चित्रपटांची ऑफर पूजाने स्वीकारली आहे. त्यामुळेच सलमान खान व पूजा हेगडेच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. पूजा ‘सर्कस’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!