मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळे वळण देणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलस आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज एैतिहासिक युतीची घोषणा केली. त्यामुळे वेगळे चित्र आगामी काळात पहायला मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत घेत या युतीची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,’गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेशी संबंधीत नाहीत त्या व्यक्ती संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊया असे सांगत आहेत. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवूया. दुहीच्या साप आमचा विश्वासघात करत आलाय, त्याला गाडू, असे सांगत त्यांनी भाजपावर निशाना साधला आहे.तर संभाजी बिग्रेडने सांगितले की, ‘गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहितवादी निर्णय घेतले होते. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे. छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे. आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, अशी घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात आम्ही शिवसेनेसोबत सहभागी राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर अनेक वेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे सुषमा अंधारे, हाके यानंतर आता बिग्रेडने देखील शिवसेनेला साथ दिल्यामुळे स्थानिक निवडणूकीत मोठे फेरबदल दिसणार आहेत.