हडपसर प्रतिनिधी – हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कामगारांना मागील तीन महिन्यापासून पगार मिळत नाही. हातावरचे पोट असल्याने कामगाराची तारांबळ चांगलीच तारांबळ झाली आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या ठेकेदाराने पगार करावा.अशी मागणी सफाई कामगारांकडून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिलाय. तीन महिन्यापासून सफाई कामगार पगाराची वाट पाहत असून उसने किंवा व्याजाने पैसे घेऊन घर चालविण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. मात्र तीन महिन्यापासून कंत्राटी सफाई कामगारांचा पगार न देणाऱ्या ठेकेदारावर पुणे महानगरपालिकेकडून कसलीही कारवाई केली जात नाही. यामागचे गौडबंगाल काय आहे ? अशी चर्चा सध्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात रंगली आहे
प्रमोद भानगिरे यांनी सफाई कामगारांच्या अडचणी समजून घेत असताना महापालिका अतिरिक्त आयुक्त त्यांच्यासोबत संपर्क करून तात्काळ कर्मचाऱ्यांचा पगार करावा,अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण २२ आरोग्य कोठे आहेत. या आरोग्य कोठ्यामध्ये एकूण ७०३ कंत्राटी सफाई कामगार काम करतात. रोज सकाळी सहा वाजता येऊन प्रामाणिकपणे सफाई कामगार हडपसर,मांजरी ,मुंढवा व इतर परिसरामधील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करतात, ओला सुका कचरा उचलणे आधी घाणीचे काम करतात. मात्र याच कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून वेळेत पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावं लागत आहे. यामुळे क्षेत्रीय कार्यालयातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस पगाराची वाट पाहावी लागत आहे हे दुर्दैव आहे.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सांगितले, कि पुणे शहरातील हडपसर भागातील रस्ते स्वच्छ करण्याचे अतिशय महत्वाचे काम सफाई कामगार करतात. प्राधान्याने ठेकेदाराने या कर्मचाऱ्यांचा पगार करणे गरजेचे असताना दुर्लक्ष करण्यात आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष घालून तात्काळ कर्मचाऱ्यांचा पगार करून घेण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा आंदोलन लागेल असे प्रमोद भानगिरे यांनी सांगितले
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जाहिरात