Latest Marathi News
Ganesh J GIF

अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या

पत्नी आणि मुलाची हत्या करत केली आत्महत्या, या कारणामुळे होते तणावात, सुसाईड नोटमुळे खुलासा

कोल्हापूर दि २४(प्रतिनिधी)- कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गडहिंग्लज मधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून आपण स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरुमचा दरवाजा न उघडल्याने आईने शेजाराच्या मदतीने दरवाजा खोलल्यानंतर संतोष शिंदे यांनी जीवन संपविल्याचे दिसून आले. यावेळी बेडरुममध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. संतोष शिंदे यांनी आधी पत्नी आणि मुलाचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर आत्महत्या केली. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. शिंदे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे. यासाठी ते एक महिना तुरुंगात देखील होते. या कारणामुळे ते सतत तणावात असायचे यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव त्यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले आहे. संतोष शिंदे यांचे गडहिंग्लज आणि त्याचबरोबर सकेश्वर परिसरात मोठा उद्योग व्यवसाय आहे.. या उद्योगांमध्ये शेकडो कामगार कामावर आहेत. त्यामुळे गडहिंग्लज परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संतोष शिंदे यांनी अगदी अल्प कालावधीत अर्जुन उद्योग समूहात आपलं नाव कमावताना गरुडझेप घेतली होती. अर्जुन उद्योग समूहात तेल उत्पादन, जि, तसेच बेकरी उत्पादनातून राज्यासह कर्नाटकमध्येही उद्योग विस्तार केला होता. त्यामुळे या घटनेनंतर सर्वपक्षीय बंदचे आवाहन करत नागरिकांनी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!