Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मिडीयाचे तापमान वाढवणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्रीच्या अंदाजाने उडाले गायकाचे होश, अल्पावधीतच व्हिडिओ व्हायरल, पहा काय घडले?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि नृत्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नम्रता मल्ला कायम चर्चेत असते. आपले नवनवे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत ती सोशल मिडीयावर तापमान सतत वाढवत असते. आपल्या साेंदर्याने आणि आयटम साँगने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्मीन केली आहे. आता नम्रता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नम्रता मल्लाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. नुकतेच तिचे दुपट्टा मे हे गाणे प्रदर्शित झाले आहे. भोजपुरी गायक नीलकमल सिंह हा या गाण्यासोबत आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे.या व्हिडिओला यूट्यूबवर खूप व्ह्यूज मिळत आहेत. या गाण्याचा व्हिडिओ १७ जून रोजी यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या दिवसापासून याला खूप व्ह्यूज मिळत आहेत. अवघ्या ५ दिवसांत हा व्हिडिओ ३८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाइक केले आहे. दरम्यान नम्रता अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत होती. पण तिला प्रसिद्धी भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या दो घुंट या गाण्याने ओळख मिळवून दिली. खेसारी आणि नम्रता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आणि हे गाणे रातोरात हिट झाले होते. मध्यंतरी ती झुमे जो पठाण गाण्यावर केलेल्या डान्समुळे चर्चेत आली होती.

अभिनेत्री नम्रता मल्ला नेहमीच तिच्या बोल्ड लूक आणि सेक्सी स्टाइलमुळं चर्चेत असते. नम्रता तिच्या फिटनेसबाबतही खूप गंभीर असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो ती यूट्यूबवर शेअर करत असते. नम्रता मल्लाचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!