Latest Marathi News
Ganesh J GIF

डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने महिला वकिलाला सरपंचाची बेदम मारहाण

बीड – बीडमधील गुंडागर्दीच्या बातम्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. कारण बीडमधील अंबोजोगाई तालुक्यात डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा राग आल्याने संतापलेल्या गावच्या सरपंचासह दहा जणांनी गावातील एका महिला वकिलास बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान सनगाव गावात ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात यासंबंधी तक्रारी दिल्या होत्या. १४ एप्रिल रोजी त्यांनी डीजेचा आवाज कमी करा अशी मागणी केली होती. याचा राग मनात धरून सनगावचे सरपंचासह दहा जणांनी ॲड. ज्ञानेश्वरी अंजान या त्यांच्या शेतातील अंबराईत कैऱ्या आणण्यासाठी आद्रकीच्या शेतातील बांधाजवळ गेल्या असता अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ व नवनाथ ज्ञानोबा जाधव यांनी त्यांच्या हातात काळा रबरी पाईप घेऊन तर, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान व सुधीर राजाभाऊ मुंडे हे हातात लाकडी काठ्या घेऊन त्यांच्या जवळ आले व तू यापूर्वी गावातील पिठाच्या गिरण्या, मंदिरावरील भोंग्याच्या तक्रारी का दिल्यास, तुझ्या आईचा कोर्टात सुरु असलेली ३०७ ची केस का काढून घेत नाहीस, तू यापुढे आमच्या विरोधात तक्रार देशील का? असे म्हणून गोलाकार रिंगण करत त्यांच्या हातातील काठ्या व रबरी पाईपने वकील महिलेच्या पाठीवर, मानेवर, कमरेवर, दोन्ही पायाच्या पाठीमागे व पार्श्वभागावर मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ‌ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे व नवनाथ दगडु मोरे या दहा जणांविरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला कोणीही मारहाण केलेली नाही. उलट तीच गावातील लोकांना त्रास द्यायची. ज्ञानेश्वरीला तिच्या घरच्यांनीच मारहाण केली असल्याचा मोठा दावा तिच्याच गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात एक नवा आणि मोठा ट्विस्ट आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!