पुणे दि ३(प्रतिनिधी )-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये महिला मुक्ती दिन, बालिका दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रयत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, सचिव शुभलक्ष्मी भोसले, आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ डॉ.स्मिता फरांदे, दंतरोग तज्ञ, डॉ.जयदीप फरांदे, दंत चिकित्सक डॉ.दीपा पलंगे, प्रिन्सिपल कल्पना जांभुळकर, प्रिन्सिपल वृषाली खामकर, व्यवस्थापक अजय काकडे, क्रीडा शिक्षक मुकुंद चव्हाण, आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला, विविध क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत लहान वयात मुलींना अनेक शारीरिक समस्या असतात त्या त्यांना मांडता येत नाहीत या समस्यांवर जनजागृती करण्यासाठी व उपाय योजना करण्यासाठी शाळेमध्ये प्रबोधन पर शिबिराचे आयोजन केल्याची माहिती लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी दिली.
12 ते 16 या वयोगटातील मुलींना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले, यामध्ये आहार, प्राणायाम, योग, मेडिटेशन, दंतरोगचा समावेश होता, यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. स्मिता फरांदे व डॉ. दीपा पलंगे यांनी मार्गदर्शन केले. महिला कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत आणि या वयोगटात मुलींच्या आरोग्याची पायाभरणी करणे आवश्यक आहे, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन साजरा करून महिलांना सक्षम करण्याचे पाऊल उचललेआहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केले.