Latest Marathi News

चक्क १०६ वर्षांच्या आजीबाईचे करण्यात आले बारसे

बारशाचे कारणही आहे एकदम खास, पाळण्यात बसलेल्या आजीचा व्हिडिओ व्हायरल

सोलापूर दि ४(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यामधील चपळगावात एका १०६ वर्षाच्या आजीबाईला दात आल्याची बातमी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. पण आता सोशल मिडीयावर त्या आजीबाईचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कारण आजीला दात आल्यामुळे चक्क आजीबाईंचे बारसे घालत आनंद साजरा करण्यात आला आहे. पाळण्यात बसलेल्या आजीबाईचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

अक्कलकोट तालुक्यातील १०६ वर्षाच्या धानव्वा उडगे या आजीबाईंना शंभरी ओलंडल्यानंतर दुधाचे दात परत आले आहेत. त्यामुळे या आजीच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लहान मुलाच्या बारशाला जशी तयारी असते तशी तयारी आजीच्या बारशाला करण्यात आली होती. विशेष म्हणजे आजीसाठी पाळणा देखिल आणला होता. कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या, नात्यातल्या महिला आवरून, नटून थटून आल्या होत्या. सगळ्या बायकांनी मिळून या आजींना उचलून घेतलं आणि जसं बारशाला कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या असं म्हणत बाळाला पाळण्यात घालतात तसं त्यांनी आजीबाईंना पाळण्यात ठेवत बारसे घालण्यात आले. या बारशाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असुन, लोकांनी कुटुंबियांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे. सध्या हा बारशाचा कार्यक्रम लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

 

इप
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा अंदाज कधीच लागत नाही. अनेकांना सोशल मिडीयावर प्रसिद्धी देखील मिळाली आहे. आपण घरगुती कार्यक्रम करत असतो पण त्याचा व्हिडिओ व्हायरल होईल याची शक्यताही आपल्याला नसते.पण अक्कलकोट मधील १०६ वर्षाच्या आजीबाईंचे बारसे तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे दात आलेल्या आजीबाईचा अनेकांना हेवा वाटत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!