
प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्रीचे वर्षाच्या आतच मोडले दुसरे लग्न?
सोशल मिडीयावरील चर्चेतील जोडी होणार वेगळी?, पोस्ट करत म्हणाली तु पुन्हा पुन्हा तीच चूक...
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने गेल्यावर्षी दिग्दर्शक रवींद्र चन्द्रशेखरसोबत लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा झाली होती. १सप्टेंबर २०२२ ला तिने रवींद्र सोबत लग्नगाठ बांधली होती. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अशी चर्चा सुरु आहे.
महालक्ष्मी आणि रवींद्र हे एकमेकांपासून विभक्त झाल्याचं म्हटले जात होते. यावर अभिनेत्रीने पती रवींद्रसोबतच एक फोटो शेअर करत या केवळ अफवा असल्याचं म्हटले आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘डिअर पुरुषा तुला किती वेळा सांगायचं तुझ्या एकट्याचा फोटो अपलोड करु नको. कारण त्यांनंतर सोशल मीडियावर आपल्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु होतात. तू पुन्हा पुन्हा तीच चूक करतोस. असे म्हणत एकप्रकारे अभिनेत्रीने लग्न मोडल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान महालक्ष्मीचे दुसऱ्यांदा एका निर्मात्याशी लग्न झाले आहे. याआधी अभिनेत्रीने अनिल नेरेदिमिलीसोबत लग्न केलं होतं. तो आधीच विवाहित होता आणि त्याला एक मूलही आहे. रवींद्र आणि महालक्ष्मी यांच्या लग्नाला आता ८ महिने झाले आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याचे ८ महिने आनंदामध्ये घालवले आहेत. या खास दिनाच्या दिवशी घरी यज्ञाचे आयोजन केले होते. दोघेही खास पूजेमध्ये एकत्र दिसले होते. तसेच रविंद्रने लग्नानंतर पत्नी महालक्ष्मीला गोल्ड प्लेटेड बेड गिफ्ट म्हणून दिला होता.याचबरोबर अभिनेत्रीला रविंद्रने दीड किलो सोने भेट म्हणून दिलं आहे.
https://www.instagram.com/mahalakshmi_actress_official/
महालक्ष्मी आणि रविंद्र यांचे लग्न पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.या दोघांच्या हनिमूनचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे या दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं होते. रविंद्र आणि महालक्ष्मी यांची पहिली भेट ‘विडियम वरई काथिरू’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.