
मराठमोळ्या तरूणीने पटकावला ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब
महाराष्ट्राच्या लेकीचा परदेशात डंका, सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हणाली संधीचं मी...
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मराठमोळ्या सोनल काळे यांनी साता समुद्रापार आपल्या भारताचा अभिमानाने झेंडा रोवला आहे. तिने ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब जिंकला आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
सोनल काळे ही लंडनमध्येच स्थायिक आहे. ही स्पर्धा भुंकणारी ती अलिकडचा काळातील पहिली अनिवासी भारतीय तरुणी आहे. आपल्या पोस्टमध्ये सोनलने म्हटले आहे की, नमस्कार. मी सोनल काळे. बॉलिवूडची कोरिओग्राफर असण्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लुअंसरदेखील आहे. कंटेट क्रिएट करण्याची मला आवड आहे. मी जन्माने भारतीय आहे. मनाने महाराष्ट्रीअन आहे तर राहायला परदेशात आहे. मी गुजराती व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. मला महाराष्ट्राचा आणि गुजरातचा अभिमान आहे. एक नवीन संस्कृती आत्मसात करायला मला आवडतं. मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं आहे. आता माझ्या स्वप्नांना मी सत्यात उतरवलं आहे. या स्पर्धेने आता मला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. आता मला माझं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली करायचं आहे. तसेच नवोदितांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मी त्यांना मदत करेल. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी मी मदत करेल”. असे सोनल म्हणाली आहे.दरम्यान सोनल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ‘चायवाली लडकी’ म्हणून ती प्रचंड लोकप्रिय आहे.
सोनल काळे हीच जन्म महाराष्ट्रीयन कुटूंबामध्ये झाला आहे. सोनल तिच्या उच्च शिक्षणासाठी ती लंडनमध्ये होती. त्यांनतर तिने एका गुजराती व्यतिसोबत लग्न केले आहे. दरम्यान सोनल ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.