Latest Marathi News
Ganesh J GIF

सेल्फी बेतली जीवावर ! सेल्फीच्या नादात १०० फूट दरीत कोसळली तरुणी; व्हिडिओ व्हायरल

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे)  – सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा नाद जीवावर बेतणाराही ठरला असल्याचा आतापर्यंत अनेक घटना समोर असतानाही साताऱ्यातील बोरने घाटात आणखी एक घटना घडली आहे. पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नसरीन अमीर कुरेशी असे या तरुणीचे नाव आहे. पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी (वय २९) आणि काही जण साताऱ्यातील संगमनगरमध्ये कारने आले होते. हे सर्वजणांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु ठोसेघर धबधबा बंद होता. त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. नसरीन सेल्फी घेत असताना अचानक तिचा तोल गेला. त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली. एका झाडाला ती अडकली. यामुळे तिचा जीव वाचला.

 

नसरीन कुरेशीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले. होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला. त्याने त्या तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!