Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रातील बड्या काँग्रेस नेत्याला प्रकृती ढासळल्याने एअर लिफ्टने दिल्लीला हलवले

प्रकृतीच्या कारणांमुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही अनुपस्थिती,दिल्लीत होणार पुढील उपचार

चंद्रपूर दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार बाळू धानोरकर यांना नागपुरातील खासगी रुग्णालयातून एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात आले आहे. त्यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे.

खासदार बाळू धानोरकर यांना आतड्यांतील इन्फेक्शनमुळे त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तातडीने दिल्ली येथे नेण्यात आले. महत्वाचे म्हणजे २७ मे रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासदार धानोरकर उपस्थित नव्हते.  सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार आहेत. बाळू धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे. आपली प्रकृती स्थिर आहे. काही चाचण्या आणि उपचारांसाठी दिल्ली जात असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. दरम्यान धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे नुकतेच नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. आज त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळू धानोरकर यांच्या मेव्हण्याच्या मागे ईडी लागली आहे. या सर्व प्रकरणांमुळे धानोरकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे प्रकृती साथ देत नाही. दुसरीकडे त्यांच्या साळ्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या निवडणुकीत फक्त एकच खासदार काँग्रेसचा निवडून आला. त्यामुळे त्यांच्या नावाची राज्यासह देशभरात चर्चा झाली होती. त्यांच्या स्वास्थ्यासाठी कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!