Latest Marathi News
Ganesh J GIF

नवीन संसदेसमोर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांची दांडगाई

एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचे उद्घाटन तर दुसरीकडे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यांवर बळाचा वापर, कुस्तीपटूंना फरफटत नेले

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- देशात आज दोन परस्पर विरोधी घटना घडल्या आहेत. एकीकडे देशातील लोकशाहीचे प्रतिक असलेल्या नव्य संसदेचे उद्घाटन होत असताना दुसरीकडे नवीन संसद भवनाकडे आंदोलन करण्यासाठी जात असलेल्या कुस्तीपटूंना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीसांनी कुस्तीपटूंना अक्षरशः फरफटत नेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचे उद्घाटन केले. तर दुसरीकडे, जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्यात आले आहे. याआधीच कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते. पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले होते, येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे. पैलवानांनी पोलिसांचे पॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि पैलवान यांच्या शाब्दिक चकमक झाली. यानंतर पोलिसांकडून आंदोलक पैलवानांना ताब्यात घेण्यात आले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंची ‘महिला सन्मान महापंचायत’ होणार होती. पण नवीन संसद भवनासमोर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच पोलीसांनी कुस्तीपटूंचे जंतरमंतरवरून सर्व तंबू देखील हटवले आहेत. पोलीसांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई विरोधात देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार सुप्रिया सुळे, राज ठाकरे यासह अनेक नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. आता कुस्तीपटूंच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशातील कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग याच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!