Latest Marathi News
Ganesh J GIF

आमदार साहेबांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केली धुलाई

आमदार धुलाईचा व्हिडीओ व्हायरल, दोन पक्ष भिडले, बघा काय वाद

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकार्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला.तरीही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. या व्हिडीओवर भाजपाने निशाना साधला आहे.पण या व्हिडीओमुळे आपची चांगलीच गोची झाली आहे.

सध्या दिल्लीत महानगरपालिका निवडणूकाचा प्रचार सुरू आहे. या निवडणूकीत आपने तिकीट विक्री केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आता व्हायरल व्हिडीओ बद्दल मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आठच्या सुमारास आमदार यादव ‘श्याम विहार’ येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते. यावेळी काही मुद्द्यावर वाद झाला आणि अचानक कार्यकर्त्यांनी आमदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आमदारांनी बचावासाठी पोलीस स्टेशन्स आधार घेतला.भाजपादेखील हा व्हिडिओ शेअर करत आपवर निशाना साधला आहे. ‘आप’ चा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की, त्याचे सदस्यही आपल्या आमदारांना आता सोडत नाहीत. आगामी एमसीडी निवडणुकीतही अशाच निकालांची प्रतीक्षा आहे. ‘आप’च्या आमदाराला मारहाण झाल्याचे ट्विट दिल्ली भाजपने केले आहे. या व्हिडीओमुळे आपची एैन निवडणुकीत चांगलीच गोची झाली आहे.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट देण्याच्या मोबादल्यात आम आदमी पक्ष पैसे मागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.तर आमदार गुलाब यादव यांनी या संपूर्ण घटनेवर ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप हतबल झाला आहे आणि तिकिटे विकल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहे.पण जनताच त्यांना उत्तर देईल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!