Latest Marathi News
Ganesh J GIF

नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच, पुन्हा दोन अपघात

सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरची कारला धडक, विचित्र अपघातानंतर चालक फरार

पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुणे-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. आजही नवले पुलावर दोन अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणहीती जीवितहानी झालेली नाही. पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच ठिकाणी ११.३० च्या सुमारास दुसरा अपघात झाला आहे. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली आहे. नवले पुल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात येथे उपाययोजनाही करण्यात आल्या. तरीही या परिसरातील अपघाताचे सत्र मात्र काही केल्या थांबायला तयार नाहीत. कात्रज बोगद्याजवळ पोलीस चौकी देखील उभारण्यात आली आहे. मात्र तरी देखील येथील अपघात थांबल नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी देखील कंटेनर व ट्रकचा अपघात या परिसरात झाला होता. यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला होता.

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या वतीने नवीन कात्रज बोगद्याजवळ पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या नव्या वाहतूक पोलीस चौकीचे आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!