Latest Marathi News

बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळवण्यासाठी तरूणीचा स्टंट

तरूणीचा स्टंट सोशल मिडीयावर व्हायरल, नेटकरींकडुन काैतुक, बघा तरूणीचा जुगाड

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- बस ही सार्वजनिक व्यवस्थेसाठी ओळखली जाते. पण बसमधील गर्दी देखील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गर्दीतही जागा मिळवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका तरूणीने लक्ष वेधले आहे.

गर्दी आणि बस हे ठरलेले समीकरण आहे. त्यावेळी एका मुलीने खिडकीजवळीची जागा मिळवण्यासाठी जोरदार जुगाड केला होता. डेपोमध्ये येताच बस प्रवाशांनी खचाखच भरली. पण त्याच वेळी एक तरुणी धावत आली. अन् तिनं थेट खिडकीतून उडी मारून चालत्या बसमध्ये विंडो सीट पटकावली. तिनं ज्या वेगानं उडी मारली ते पाहून इतर प्रवासी सुद्धा शॉक झाले. या तरुणीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तिचा हा जुगाड कोणीतरी आपल्या कॅमे-यात कैद झाला आहे. बसमध्ये गर्दी असतानाही तरूणीने काही क्षणात जागा पटकावली आहे.

 

या तरुणीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. “भारतीय मुलींना कमी लेखू नका, हे काम फक्त भारतीय मुलींनाच जमू शकतं, ही मुलगी खरंच खूप स्ट्रॉंग आहे.” अशा प्रतिक्रिया देत तिचं कौतुक केलं जात आहे. तुम्ही बसमध्ये शिरण्यासाठी अशी स्टंटबाजी कधी केली आहे का? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!