समीर वानखेडेंवर या प्रसिद्ध माॅडेलचे गंभीर आरोप
समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, म्हणाली 'त्याने माझ्यासारख्या अनेकांना...
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता मॉडेल मुनमुन धमेचा हिने वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. मुनमुन धमेचाने दिलेल्या माहितीनुसार ती इतके दिवस भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल अशी तिला आशा आहे. ”प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात अडकवले आहे. प्रसार माध्यमे त्यांच्या कारवाईला दाद देतात हे त्यांना माहित होते म्हणूनच त्यांनी सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींवर निशाणा साधला”. दरम्यान त्यावेळी ऑक्टोबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात, एनसीबीने मुनमुन धमेचासह आर्यन खान आणि इतरांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. मुनमुन धमेचा आणि आर्यन खान यांना २८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आता मुनमुनच्या या आरोपांचा वानखेडेंवर परिणाम होणार का आता या कडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती परिवारामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. मुनमुन धमेचाच्या आईचे निधन झाले होते. तीचा भाऊ प्रिंन्स भमेचा सध्या दिल्लीमध्ये राहतो.