शाहरुख खानचा लेक करतोय पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट
आर्यन खानचे अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, रिलेशनशिपच्या चर्चा सुरू
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत असताना. दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेहीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला होता.तो एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय ही बातमी समोर आली आहे.
आर्यन खानचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये आर्यन खान पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबत दिसतो आहे. आर्यन खान आणि सादिया खान पोज देताना दिसत आहेत. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो नेमका कुठला आहे, कोणत्या ठिकाणी दोघांची भेट झाली याबाबत कोणतीही माहिती नाही. आर्यन आणि सादियाचा हा व्हायरल फोटो फिल्मी वेव्ह या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी आर्यननं पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तर सादिया खाननं काळ्या रंगाचा ड्रेस आणि जॅकेट परिधान केलं आहे. आर्यन आणि सादियाचा हा फोटो कुठला आहे आणि ते दोघं कोठे भेटले होते हे अद्याप समोर आले नाही.
सादिया खान ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. गेल्या ११ वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तीने छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सादिया ‘खुदा और मोहब्बत’ या मालिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. सादिया ‘खुदा और मोहब्बत २’, ‘शायद’, ‘मार्यम पेरिरा’ आणि ‘अब्दुल्ला द फायनल विटनेस’ यामध्ये दिसली होती.