Latest Marathi News
Ganesh J GIF

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल कोश्यांरींच्या मनात नेमकं काय चाललंय?, विरोधक आक्रमक

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही कायम ठेवली आहे. फुले दाम्पत्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारं वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं ते वादात सापडले आहे. त्यामुळं आता त्यांच्या नव्या वक्तव्यावरून वादंग पेटण्याची शक्यता आहे.

राज्यापाल आणि वाद हे समीकरणच आता रूढ झाल्यासारखी स्थिती आहे. कारण मुंबईच्या राजभवनातील आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे.हिंदीत भाषण करताना राज्यपाल म्हणाले की, ‘आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घर में नही, दुसरों के घर में होने चाहिए’, असं म्हणत राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांसह चंद्रशेखर आझाद यांच्यासह अन्य महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे.महाराष्ट्रात राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या वादात नेहमीच अडकलेले आहेत. राज्यपाल जाणूनबुजून महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करत असल्याची भावना मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळं आता कोश्यारींच्या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेयर केला असून त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानाचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.राज्यपाल कोश्यांरींच्या मनात नेमकं काय चाललंय?, त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खुलासा करतील का?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे – फडणवीसांवर टीका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!